मराठा समाजाच्या तरुणांनी आत्महत्या करु नये : मराठा समाजाला 'आरक्षण मिळणारच', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे दिनांक २२ऑक्टोबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात मराठा आरक्षण साठी मराठा समाज मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाला असून मराठा समाजाला 'आरक्षण मिळणारच ' हा एकनाथ शिंदे यांचा शब्द आहे.असे मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे. दरम्यान मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या करणं ही बाब अत्यंत दुःखद आहे.असे देखील मुख्यमंत्री यांनी यावेळी म्हटले आहे.मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. असे आश्र्वासन देखील त्यांनी दिलेले आहे.यात अनेक बाबी कायदेशीर आहे व त्या पूर्ण करण्याचे काम सुरू आहे.त्यामुळे मराठा समाजाच्या बांधवांनी थोडा धीर धरावा असं देखील ते म्हणाले दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक होत सरकारला अल्टीमेटम दिला आहे.तो २४ ऑक्टोबरला संपत आहे. त्यानंतर ते आमरण उपोषणाला बसणार आहेत.
दरम्यान आता सरकारच्या वतीने सर्वेच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली आहे.यात आता सर्वेच्च न्यायालया देखील यात लक्ष घालणार आहे.मागील वेळेस काही गोष्टी सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या नव्हत्या यावेळी मांडण्यात येतील.व आरक्षण देण्याची आमची जबाबदारी आहे.ज्याप्रमाणे सरकारने शब्द दिला आहे.त्याच मुद्द्यांवर काम सुरू आहे.मराठा समाजाच्या तरुणांनी आत्महत्या करु नये.मराठा समाजाच्या तरुणांचा जीव इतका स्वस्त नाही.म्हणून तरुणांनी आपल्या घरच्यांचा विचार करायला हवा आम्ही मराठा समाजाला जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न करत आहे.मी कोणत्याही प्रकारची खोटी आश्वासने देत नाही.त्यामुळे सरकार हे मराठा समाजाच्या बाजूने आहे.असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे म्हणाले आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.