मराठा आरक्षणांच्या मुद्द्यांवरुन अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांचा राजीनामा : मराठा समाज आक्रमक मराठा आरक्षण प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे गटातील नेत्याचा राजीनामा

पुणे दिनांक २६ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाचे आंदोलन आता संपूर्ण महाराष्ट्रात पेटले असून सर्वंच मराठा समाजाचे नेते आता प्रचंड प्रमाणावर आक्रमक झाले आहेत.तर गावा गावात साखळी उपोषण तर तीन हजारांपेक्षा अधिक गावात सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.तसेच अनेक गावांच्या वेशीवर पुढाऱ्यांना गावबंदीचे फलक लावण्यात आलेले आहेत.आता या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे यवतमाळ येथील सहसंपर्कप्रमुख प्रमुख चितांगराव कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.व जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शिवसेनेत काम करणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.तसेच मराठा आरक्षण संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांचा कालावधी देऊन देखील राज्य सरकार हे मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाही.व राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेला शब्द पाळला नसल्याचे म्हटले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.