राज्य सरकार ईडब्लूएसची जाहिरात करते पण मराठा तरुणांना नोकरीत सामावून घेत नाही : मराठा तरुण नोकरी साठी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत आहे त्यांना तातडीने नोकर भरतीत सामावून घ्या.अशोक चव्हाण

पुणे दिनांक २२ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात कंत्राटी नोकरी भरतीचा महाराष्ट्र राज्य सरकारने काढलेल जीआर संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या आंदोलना नंतर मागे घेतला.परंतू मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळण्या आगोदर ज्या मराठा तरुणांची विविध विभागा मध्ये निवड झाली होती.त्यांना नोकर भरतीत सामावून घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र अद्याप महावितरण व पीएसआय पदाच्या भरतीमधील उमेदवारांना न्याय मिळाला नाही.अशा सर्वच उमेदवारांना नियुक्त्या द्याव्यात अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी करुन राज्य सरकारची चांगलीच कोंडी केली आहे.
दरम्यान पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की या दोन्ही विभागातील पदाच्या भरतीसाठीचे उमेदवार आजही मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत.अशी टीका त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिंदे सरकारवर केली आहे.दरम्यान त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे.विषेश म्हणजे मराठा समाजाला ईडब्लूएस अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा बाबतची माहिती देणारी जाहिरात आज राज्य सरकारच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आल्या नंतर योग्य असं टायमिंग साधून अशोक चव्हाण यांनी मुद्दा उपस्थित केला आहे.दरम्यान या जाहिराती बाबत आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी देखील सरकारच्या या जाहिराती बाबत राज्य सरकारची चांगलीच पोलखोल केली आहे. ईडब्लूएसच्या आरक्षणावरुन राज्य सरकार मधील एकनाथ शिंदे.देवेंद्र फडणवीस व अजित पवार सरकारने जाहिरात दिली.या जाहिराती मध्ये सरकारने मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासा साठी कटीबद्ध असल्याचे म्हटले आहे.विषेश म्हणजे याच सरकार मधील लोकांनीच इडब्लूएसच्या या आरक्षण प्रवर्गात मराठा समाजाला आरक्षण मिळत असल्याचा उल्लेखही सरकारकडून केला गेला होता.यावर आता नवीन वाद उफाळून येणार आहे.
दरम्यान याप्रकरणी अशोक चव्हाण यांनी यांच्या मागणीने राज्य सरकारची आणखी कोंडी केली आहे.मराठा समाजाच्या आरक्षणांच्या अंमलबजावणीवर स्थगिती आल्यानंतर अपूर्णावस्थेत असलेले अनेक विभागातील नोकर भरती प्रक्रियामध्ये मराठा उमेदवारांना अधिसंख्या पदांवर सामावून घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.यात महावितरण व पीएसआय भरतीमधील उमेदवार आज देखील मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत आहे.तर पीएसआय पदाच्या भरतीमधील मराठा उमेदवारांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे.तसेच दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या स्थापत्य कनिष्ठ अभियंता सरळसेवा भरतीमध्ये ५२ ईडब्लूएसच्या उमेदवारांना डावलण्यात आले आहे.व इतरांना नियुक्त्या दिल्या आहेत.मराठा तरुणांना लवकारा लवकर नियुक्त्या मिळाव्यात यासाठी सगळ्यांनी प्रर्यत्न करावेत असे आवाहन देखील समाज माध्यमातून केले जात आहे.अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.त्यामुळे आता राज्य सरकारची एकप्रकारे चव्हाण यांनी कोंडीच केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.