मुंबई -गोवा मनसे पदयात्रा सुरू : मुंबई -गोवा महामार्गावर खड्यांच्या दुर्दशासाठी मनसे आक्रमक मनसेची जागर पदयात्रा सुरू

पुणे दिनांक २७ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रातील सर्वत्रच महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर बघायला मिळते.यात मुंबई -गोवा महामार्गावर तर खड्यात रस्ता आहे.का रस्त्यात खड्डे आहे.हेच वाहनांच्या चालकांना दिसत नाही.रस्ताची पूर्ण चाळणच झालेली बघायला मिळत आहे. मागील १७ वर्षांपासून या महामार्गाचे काम कासव गतीने चालू आहे .हा रस्त्याचे काम रखडलेले आहे.यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली असून युवा नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज पहाटे पासून जागर पदयात्रेला सुरुवात झाली आहे.
दरम्यान या जागर पदयात्रात युवा नेते अमित ठाकरे यांच्यासह बाळा नांदगावकर.संदीप देशपांडे.यांच्यासह अनेक कार्यकर्ते यात सहभागी झाले आहेत.ही जागर पदयात्रा एकूण १६ किलोमीटर असणार आहे.या जागर पदयात्रेच्या माध्यमातून झोपलेल्या सरकारला जागे करण्याचे काम या पदयात्रेचा उद्येष आहे.असे मनसेच्या वतीने सांगण्यात आले आहे.यावेळी मुंबई - गोवा महामार्गाची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली आहे.व आता चालू असलेले काम देखील निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला आहे.तर ही पदयात्रा टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहे.यावेळी बोलताना युवानेते अमित ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले की.आता ही जागर पदयात्रा शांततेत चालू असून या महामार्गाचे काम व्यवस्थित न झाल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल व ते वेगळे असेल याची सरकारने दक्षता घ्यावी.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.