Sambhaji bhide : “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही” - संभाजी भिडे

आज संभाजी भिडे ( Sambhaji bhide ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. एका महिला पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले.
राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगत आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. अशातच 'शिवप्रतिष्ठान'चे संस्थापक संभाजी भिडे ( Sambhaji bhide ) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. यावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चा होत आहेत.
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे ( Sambhaji bhide ) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात आले तेव्हा संभाजी भिडे ( Sambhaji bhide ) यांच्याशी बोलण्यासाठी एक महिला पत्रकार पुढे आली. त्यांनी संभाजी भिडे यांची चौकशी सुरू केली. मात्र, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आधी “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही. मग तुमच्याशी बोलेन”, असे उत्तर संभाजी भिडे यांनी दिले, असे संभाजी भिडे ( Sambhaji bhide ) म्हणाले.
त्यांच्या या वक्तव्याचा महिला आयोगाकडून निषेध करण्यात येत आहे.
सतत उपासना करणाऱ्या स्त्रियांच्या विकृतीचे उच्चाटन करणे.. याचा महिला आयोगाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. तसेच महिला आयोगाच्या वतीने संभाजी भिडे यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.