लोकसभा अध्यक्षांच्या नावाने स्वतःच्या लेटर हेडवर राजीनामा लिहून मराठा आंदोलंकाना दिला : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री शिंदे गटाच्या हिंगोलीच्या खासदाराने दिला राजीनामा महाराष्ट्रात एकच खळबळ

पुणे दिनांक २९ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्द्यांवर संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर वणवा पेटला आहे.अनेक गावा गावात आमदार व खासदार यांना गावबंदी करण्यात आली आहे.तर अनेकजणांनी आपला राजीनामा दिला आहे.मराठा समाजाचे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आले आहे.काही आमदार यांनी आरक्षणासाठी पाठिंबा देत आता सरकारलाच धारेवर धरले आहे.अशातच महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी अपडेट समोर येत आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे हिंगोलीचे खासदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्द्यांवरुन पाठिंबा देण्या साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा शिवसेनेचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिला आहे.मराठा समाजातील आरक्षणांच्या मागणी साठी आपण केंद्र सरकारच्या दरबारात मांडावी याकरिता मराठा समाजाच्या आंदोलंकानी त्यांची भेट घेतली व यावेळी आंदोलंकानी खासदारकीचा राजीनामा द्या अशी मागणी केली.त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नावे स्वताच्या लेटर हेडवर राजीनामा लिहून मराठा आंदोलंकाना दिला आहे.यामुळे मराठा समाज आरक्षणांच्या मुद्द्यांवरुन किती आक्रमक झाला आहे हे यावरून दिसून येते.मुख्यमंत्री यांच्या गटाचे खासदार हेमंत पाटील यांना मराठा आरक्षणाची या युवकांना किती काळाची गरज आहे हे समजून आले पण त्यांच्या नेते व मराठा असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अजून समजलेले नाही.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.