Balasaheb Thorat vs Tambe-dispute : नाशिक पदवी धर निवडणूक मामू को मामू बनाया. बाळासाहेब थोरात विरुद्ध तांबे वाद पेटणार!

विधान परिषद पदवीधर नाशिक मतदारसंघातून काँग्रेसने मोठी खेळी खेळली. काँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव आणि युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सत्यजीत तांबे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, अर्ज दाखल करताना ऐनवेळी काँग्रेसने सत्यजीत तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून वेळेत एबी फॉर्म न मिळाल्याने सत्यजीत तांबे हे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार असणार आहेत.
महाविकास आघाडीमध्ये झालेल्या चर्चेनुसार नाशिक पदवीधर विधान परिषदेची जागा ही काँग्रेसला देण्यात आली होती. काँग्रेसने या निवडणुकीत पुन्हा एकदा डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. डॉ. सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून तीन वेळेस विजयी झाले आहेत. आज सकाळीदेखील सुधीर तांबे हेच काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी स्पष्ट चिन्हं होती. बुधवारी, सुधीर तांबे यांनी निवडणूक अर्ज भरण्यास जाणार असल्याचे ट्वीटही केले होते. तर, दुसरीकडे सुधीर तांबे यांचे चिरंजीव आणि युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे भाजप कोणाला उमेदवारी जाहीर करणार, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.
कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे सत्यजीत तांबे यांचे मामा आहेत,दरम्यान आजचे राजकीय नाट्य पाहाता राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती सत्यजीत तांबे यांनी फडणवीसांची साथ देत मामाला 'मामा' बनवलं याची. कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि कॉग्रेस पक्ष यांना तांबे पीता-पुत्रांकडून अंधारात ठेवलं असल्याचे बोलले जात आहे.
यामुळे आता थोरात विरोधात तांबे असा संघर्ष अहमदनगरच्या राजकारणात सुरू झाल्याची चर्चा देखील आहे. कॉंग्रेसने उमेदवारी जाहीर करून देखील फॉर्म न भरल्याने सुधीर तांबे यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाणार का हे देखील उत्सुकतेचा विषय आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.