Politiks : निवडणूक आयोगाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गट उत्तर सादर करणार नाही?

पुणे दिनांक १६ऑगस्ट((पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार गट उद्या दिनांक १७ऑगस्टला निवडणूक आयोगाला उत्तर सादर करणार नसल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून समजते.अजित पवार गटाने कोणती कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर केली आहेत.याची यादी द्या म्हणजे त्या कागदपत्रांच्या आधारे त्यावर आम्हाला उत्तर देता येईल असा मेल त्यांनी निवडणूक आयोगाला केला आहे.पण याबाबत मला . कोणत्याही प्रकारचे उत्तर मला आले नाही.आता याबाबत शरद पवार गटाने ४ आठवड्यांचा वेळ वाढवून मागितला आहे.पण याबाबत निवडणूक आयोगाचे उत्तर आले नाही.उद्या उत्तर दाखल करण्यांची शेवटची तारीख आहे.
दरम्यान शरद पवार यांनी एक मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे की.शिवसेना फुटी नंतर चिन्हा बदल जो निर्णय झाला.त्याच प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडून चिन्ह जाण्याची चिंता आहे.असा काहींचा डाव आहे.निवडणूक आयोगाची आम्हाला नोटीस आली आहे.त्यामध्ये काही मागण्या केल्या आहेत.शिवसेना चिन्हाच्यां निर्णयात केंद्राच्या मोठ्या शक्तीनी हस्तक्षेप केला.तसा हस्तक्षेप होऊ शकतो.मात्र चिन्हांची मला चिंता नाही.असे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.