कोल्हापूर निर्धार सभा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कोल्हापूरच्या निर्धार सभेत मंत्री हसन मुश्रीफ यांना टोला

पुणे दिनांक २५ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) कोल्हापूर येथे झालेल्या निर्धार सभेत बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंत्री हसन मुश्रींफावर हल्लाबोल करताना म्हणाले की घरातील महिलांनी धाडस दाखविले पण. घरातील प्रमुख ईडीला घाबरले पुढे बोलताना पवार म्हणाले की आजचे राजकारण कसे बदलत आहे.ते आपण पाहत आहोत ईडीचा धाक दाखविला जात आहे.व त्या धाकापोटी काहींनी आपली भूमिका बदलली.
दरम्यान पुढे बोलताना पवार म्हणाले की." आताच आपण बघितलं महाराष्ट्रात ईडीच्या नोटीसचा दम काही नेत्यांना दिला.काही लोकांनी तोंड दिलं.पण काही लोकांनी भूमिका बदलली.कोल्हापूर हे शूरांचं गाव आहे.ही नदी व जिल्ह्याचा इतिहास हा शौर्याचा आहे. त्यामुळे इथे ईडीची नोटीस आली तर सामोरं जायची हिंमत दाखवली जाईल.अशी माझी कल्पना होती.पण इथे काहीतरी वेगळं घडलं," असं म्हणत शरद पवार यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधायला सुरुवात केली." कोल्हापूरात कुणालातरी नोटीस आली.कुणाच्या घरी सीबीआयचे लोकं गेली.कुणाच्या घरी इन्कम टॅक्सचे लोकं गेले.एकेकाळी आमच्या बरोबर काम केलेले लोकं काहीतरी स्वाभिमान असेल.घरातल्या महिलांनी सांगितलं . ज्या प्रकारे तुम्ही आमच्यावर आरोपांचे हल्ले करता.धाड घालत आहात . यापेक्षा तुम्ही आम्हाला गोळ्या घाला.असे एक बघिणी म्हणू शकते.पण कुंटुंबप्रमुखाने असं काही म्हटलेलं मी ऐकलं नाही.ज्या बघिणीने धाडस दाखवलं ते धाडस दाखवण्याऐवजी भाजपसोबत जावू.ते म्हणतील तिथे बसू आणि यातून आपली सुटका करून घेऊ . अशी भूमिका घेतली," असा टोला शरद पवारांनी मंत्री हसन मुश्रींफांना लगावला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.