Navi Mumbai : राष्ट्रवादीचे नवी मुंबई मधील सहा नगरसेवक एकनाथ शिंदे गटात जाण्याच्या तयारीत?

Navi Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता आपला मोर्चा शिवसेनेनंतर राष्ट्रवादीकडे वळविला आहे. ते आता राष्ट्रवादीलाच टारगेट करण्याच्या तयारीत आहे. नवी मुंबई मधील सहा नगरसेवक राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याचे विश्वासनीय सूत्रांकडून कळत आहे.
गेल्या दोन महिन्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जबरदस्त धक्का देऊन. शिवसेनेतून ४० आमदार आपल्या सोबत घेऊन ठाकरे सरकारला जय महाराष्ट्र करीत भाजपा बरोबर आपला संसार थाटत ठाकरे सरकारला सत्तेवरून खाली ओढले. त्यामुळे राज्यात मोठे सत्तांतर झाले. व स्वतः मुख्यमंत्र्यांची माळ आपल्या गळ्यात घालून घेतली. आता त्यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसकडे नवी मुंबईमध्ये वळविला आहे. व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहा नगरसेवक आपल्या गटात घेण्याचा प्रयत्न चालू केला आहे. असे झाल्यास नवी मुंबईत राष्ट्रवादीला चांगलाच फटका बसणार आहे.
या पहिल्या टप्पा सहा नगरसेवकांचा असला तरी येणाऱ्या काळात बरेच कार्यकर्ते व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादीचा एका आमदाराच्या कार्यपद्धतीला. हे सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व नगरसेवक नाराज असल्याचे उघडपणे बोलून त्यांनी दाखविले आहे. व तसा संकेत देखील त्यांनी पक्षप्रमुखांना दिला होता. परंतु सध्या चालू असणाऱ्या पित्रूर पंधरवड्यानंतर हा एक गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाणार आहे. असे विश्वासनीय सूत्रांकडून कळत आहे. काही काळा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद नवी मुंबईत होती पण आता. अनेक जण या न त्या कारणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.