Chinchwad by-election : चिंचवड पोटनिवडणुकीत नवा प्लेयर, भाजपा-राष्ट्रवादी ला टक्कर?

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झाल्याने चिंचवड विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. त्या जागेवर आता निवडणुक आयोगाने पोटनिवडणुक जाहीर केली असून त्यासाठी 26 फेब्रुवारी रोजी मतदान तर 2 मार्चला मतमोजणी होणार आहे. मात्र या जागेवर कुणाला उमेदवारी देण्यात यावी असा पेच सध्या राष्ट्रवादी अन् भाजपमध्ये असतांना या पोटनिवडणुकीत आता आम आदमी पार्टीने देखील उडी घेतली आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत चांगलीच रंगत बघायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भाजपकडून लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ही पोटनिवडणुक लढविण्याचे संकेत दिले आहे. यातच पिंपरी चिंचवड मध्ये आम आदमी पार्टीची संघटनात्मक ताकद मोठी असून इतर राजकीय पक्षांच्या अंतर्गत राजकारणाला येथील जनता कंटाळली आहे. त्यामुळे आम आदमी पार्टी देखील या पोटनिवडणुक उमेदवार देणार असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी दिली आहे. त्यामुळे आता या पोटनिवडणुक जोरदार चुरस बघायला मिळणार आहे.
दरम्यान, लक्ष्मण जगताप यांचं 3 जानेवारी रोजी दिर्घ आजारपणामुळे निधन झालं. त्यांच्या निधनानंतर येथील विधानसभेची जागा रिक्त झाली असून त्यांच्या जागी आता शंकर जगताप यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. परंतु शंकर जगताप यांना उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादी देखील आपला उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. यातच आता आम आदमी पार्टीकडूनही आपला उमेदवार देण्याचे संकेत दिल्याने याठिकाणी ही लढत जोरदार होण्याची शक्यता आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.