मराठा आरक्षणांच्या मुद्द्यांवरुन आंदोलंकानी नारायण राणे यांच्या प्रतिमेला घातला चप्पलाचा हार : मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेला आंदोलंकानी मारले जोडे

पुणे दिनांक २८ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाचे नेते उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील हे २५ ऑक्टोबर पासून दुसऱ्यांदा उपोषणाला बसले आहेत.त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात साखळी उपोषण मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आले आहे.दरम्यन उपोषणकर्ते यांचा उपोषणाचा चौथा दिवस आहे.केंदीये मंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल मराठा समाजाचे आंदोलक प्रचंड संतप्त झाले.त्यांचा जाहीर निषेध करत त्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारण्यात आले.व त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले आहे.
दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात शांततामय वातावरणात मराठा समाजाचे आरक्षण साठी आंदोलन सुरू आहे.दरम्यान संभाजीनगर येथील मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते रविंद्र मुठे यांनी मराठा आरक्षण संदर्भात केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना मोबाईल वरुन संपर्क साधला असता.नारायण राणे यांनी समस्त मरठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे व्हायरल झाले आहे.त्यामुळे संतप्त झालेल्या मराठा समाजाचे कार्यकर्ते नारायण राणे यांचा जागोजागी निषेध व्यक्त केला.पाटण सुरू असलेल्या साखळी उपोषण ठिकाणी नारायण राणे यांच्या प्रतिमेला चप्पलांचा हार घालून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत दहन केले.यावेळी राजकीय नेत्यांनी मराठ्यांच्या भावना दुखवतील असे वक्तव्य करुन शांततेच्या मार्गाने चाललेले साखळी आंदोलन चिघाळू नये.असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.