मराठा आरक्षण : ठाकरे गटाच्या वतीने राज्यपालांची भेट घेऊन मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसंदर्भात लक्ष घालण्याची केली विनंती

पुणे दिनांक ६ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षण बाबत मोठे वादळ उठलं आहे.आज मराठा आरक्षण व अन्य विविध मागण्यांसंदर्भात उध्दव ठाकरे गटानं राज्यपाल रमेश बैस यांची आज दिनांक ६ सप्टेंबर रोजी भेट घेतली आहे.यावेळी त्यांनी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलकांनवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी राज्यपाल यांनी लक्ष घालावे अशी विनंती ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली.या बैठकीत काय चर्चा झाली व कुठल्या मुद्यांवर चर्चा झाली.याची माहिती आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले " हे सरकार पूर्ण पणे नालायक आहे,असं मी नव्हे तर काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाच्या निकालात हे निरीक्षण नोंदविण्यात आलं होतं असं ते म्हणाले.
दरम्यान याप्रकरणी पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की. कारण मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात आरक्षण संदर्भात उपोषण करीता बसलेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांनवर पोलिसांच्या वतीने लाठीचार्ज करण्यात आला.आम्ही राज्यपाल महोदयांना या बाबत विनंती केली की.राज्यात घटना बाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांना बोलावून जरा समाज द्यावी.कायदा नावाचा काहीतरी प्रकार असतो,व त्या नुसार सर्वकाही चाललं पाहिजे . देशाच्या कायद्याचा वापर केला पाहिजे.पण तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल की सध्याची सत्ता देखील बेकायदा आहे.अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.