जरांगे पाटील आज निर्णय झाला नाही तर पाणी त्याग करणार : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री यांनी तातडीने सर्व पक्षीय नेत्यांची सह्याद्री अतिथीगृहात बोलावली बैठक.शरद पवार यांच्यासह सर्वच नेतेमंडळी रहाणार उपस्थित

पुणे दिनांक १नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर चिघळला आहे.मराठा आरक्षणावर मार्ग निघत नाही.तर यामुळे मराठा समाज हा प्रचंड आक्रमक झाला आहे.आणि दुसरीकडे मात्र उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज आरक्षणांच्या बाबत ठोस निर्णय राज्य सरकारने घेतला नाहीतर आजपासून पाणी त्याग करणार आहेत.असा इशारा काल मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषदेत दिला आहे.त्यामुळे आंदोलन अधिकच तीव्र होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता थेट सर्व पक्षीय नेत्यांची बैठक सह्याद्री अतिथीगृहात बैठक बोलावली आहे.यावर आज काय तोडगा निघतो पाहुया.
दरम्यान आज मुंबई मधील सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सकाळी १०.३० वाजता सुरू होणार आहे.या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार व वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर व पासून महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षीय नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.या बैठकीत आता सत्ताधारी व विरोधी पक्षनेते तसेच अनेक राजकीय नेतेमंडळी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी सरसकट सर्वच मराठ्यांचा ओबीसीत समावेश करण्याची मागणी केली आहे.व मराठ्यांना कुणबीचे प्रमाणपत्र सरसकट द्यावे.किंवा मराठ्यांना ५० टक्क्यांच्या आत टिकणारं आरक्षण द्यावे ही मागणी केली आहे.सदरचे आरक्षण टिकणारं असच हवं.तर दुसरीकडे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावण्याची सत्ताधारी व विरोधकांची भूमिका आहे.त्या मुळे आता राज्य सरकार समोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.