Jaideep thackeray : ओरिजनल शिवसेना उद्धव काकांचीच व मी देखील काकांसोबत जयदीप ठाकरे

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर पक्षाला एक प्रकारे चांगली गळती लागली आहे. फक्त पक्षाचेच नेते नाही तर ठाकरे कुटुंबीय देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने होत आहे. आता उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ बंधू जयदेव ठाकरे यांचे पुत्र जयदीप ठाकरे यांनी उद्धव ठाकरे गटात काकांबरोबर जाण्याचा एक प्रकारे स्पष्टपणे संकेतच दिले आहेत.
एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना जयदीप ठाकरे म्हणाले." प्रत्येक व्यक्तीचे एक महत्व भूमिका असते. आता माझे वडील का एकनाथ शिंदे गटात गेले.? तेच यावर त्यांची भूमिका मांडतील. माझी भूमिका मात्र मी स्पष्ट केली आहे की. मला उद्धव काका यांच्याबरोबर जायचे व त्यांना सपोर्ट करायचे आहे. व काकाची शिवसेना ही ओरिजनल शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष मोठा केला. व त्यांनी अनेकांना मोठे केले. त्यांनी हे उपकार विसरू नये. आता आजोबा असतील तर त्यांना या सर्व गोष्टीचा खूप त्रास झाला असता. पण बाबांनी ही भूमिका का घेतली हे त्यांनाच माहित त्यांनी चूक केली की बरोबर.? पण मी काय बरोबर करतोय हे मला माहित आहे. यावर उद्धव काकांनी माझ्यावर काही जबाबदारी दिली तर मी ती जरूरपणे त्या जबाबदारीचा स्वीकार करेल असे ते म्हणाले.
दरम्यान पुढे बोलताना ती म्हणाली की " संधी मिळाली तर मी राजकारणात येण्यास उत्सुक आहे. माझे वडील त्या व्यासपीठावर जाणार हे मलाच काय कोणाला माहीत नव्हते. तो माझ्यासाठी नक्कीच एक आश्चर्याचा एक धक्का होता. मी खूप दिवस झाले मी वडिलांच्या संपर्कात नाही. मी उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात आलो त्याला आईची सुद्धा पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांची वेळ घेऊन मी त्यांच्याशी व्यवस्थित बोलणार आहे. कठीण काळात कुटुंब एकत्र यायला पाहिजे " असेही जयदीप ठाकरे म्हणाले
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.