महाराष्ट्रात आता मराठा समाज आक्रमक गावा गावात झळकू लागले नेत्यांना नोएन्ट्रीचे फलक : "चुलीत गेले पक्ष, चुलीत गेले नेते;आता फक्त मराठा आरक्षण आमचे लक्ष", आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावात ' नोएन्ट्री'

पुणे दिनांक २३ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात आता मराठा समाजाला आरक्षण हा मुद्दा चांगलाच पेटला आहे.आता याचे लोण संपूर्ण महाराष्ट्रात गावा गावात व घरा घरात पोहोचले आहे.मराठा आरक्षणांचा प्रश्न सुटेपर्यंत विधानसभा विधानपरिषद.लोकसभा व राज्यसभा मध्ये कायद्याच्या पदांवर बसलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावात येऊ देणार नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण महाराष्ट्रात या नेत्यांना गावात प्रवेश बंदीचे मोठं मोठे होर्डिंग्ज वेशीवरच झळकायला लागले आहेत.असेच एक मोठे होर्डिंग्ज सांगली जिल्ह्यात खानापूर तालुक्यातील हिंगणगादे गावातील नागरिक व ग्रामस्थ यांनी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.असा मोठे होर्डिंग्ज गावाच्या वेशीवरच दर्शनी भागावर लावण्यात आला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सकल मराठा समाज आता प्रचंड प्रमाणावर आक्रमक झाला आहे.आता मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे.व याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात आता मोठ्या प्रमाणावर सुरू झालेले आहे.आता जरांगे पाटील यांनी निर्णायक आंदोलन जाहीर केले आहे.व या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे.व संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज आता रस्त्यावर उतरला आहे.व त्यांनी त्यांच्या गावात राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे.आता मराठा समाजाच्या आरक्षणात खोडा घालणांऱ्या नेत्यांना मराठा समाज त्याला त्याची राजकीय जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही याची सुरुवात देखील झाली आहे.छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक यांनी मुंबई बाजार समितीचे होळकर यांनी राजीनामा दिला आहे.तर पिंपरी चिंचवड येथे देखील भाजपचे कार्यकर्ते पवार यांनी देखील राजीनामा दिला आहे.तसेच काल बीड जिल्ह्यात मराठा समाजाच्या आरक्षण विरोधात वळवळ करणाऱ्या नेत्यांचे प्रतीत्तामक पुतळ्याला जोडे मारुन दहन करण्यात आले आहे.आता ठिक ठिकाणी आंदोलनला व जरांगे पाटील यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे.येवल्यातील देवरगाव व कातराणी येथील ग्रामस्थांनी नेत्यांना गावबंदी केली आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.आता मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला विरोध करणांऱ्या वाचाळवीर नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे.व ठिक ठिकाणी तालुका दंडाधिकारी यांना आता तसे पत्र दिले जात आहे.यापूर्वीच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला याची पूर्वकल्पना दिली आहे.२४ ऑक्टोबर नंतर हे आंदोलन सरकारला झेपणार नाही.पण आता सरकार रोजच जाहिरात बाजी करुन एम एस डब्लू च्या माध्यमातून मराठा समाजाला सरकार किती फायदा देत आहे.पण आता ही वेळ नाही. याचा फायदा देखील मराठा तरुणांना नोकरीत झालेला नाही.आणी आता पुलाखालून बरेच पाणी गेले आहे.व सरकार हे हातबल झाले आहे.असे एकंदरीत चित्र आता निर्माण झाले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.