PCMC and Kasba Peth By-election : पिंपरी चिंडवड आणि कसबा पेठेची पोटनिवडणूक जाहीर, 'ही' आहे तारीख

कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. तर पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचंही नुकतंच निधन झालं. या दोन्ही आमदारांच्या जागी आता पोट निवडणूक घेतली जाणार आहे.
पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात 27 तारखेला ही पोटनिवडणूक होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार, 31 जानेवारी 2023 रोजी उमेदावारांची नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होईल.
07 फेब्रुवारी 2023 पर्यंत ही अर्ज भरण्याची शेवटची मुदत असेल.
08 फेब्रुवारी 2023 उमेदवारी अर्जांची छाननी होईल.
10 फेब्रुवारी 2023 रोजी शुक्रवारी अर्ज परत घेण्याची तारीख असेल.
27 फेब्रुवारी 2023 रोजी या जागांसाठीचं मतदान पार पडेल.
02 मार्च रोजी मतमोजणी होईल.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.