' चिंधी चोराने माझ्याशी वाद चालू नये', : नारायण राणेंवर प्रकाश आंबेडकर यांची सडकून टीका

पुणे दिनांक २ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) ' नारायण राणे या चिंधी चोराने माझ्याशी वाद चालू नये'.मी बाबासाहेब यांचा नातू आहे ',असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.लातुर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे.दरमयान नारायण राणे म्हणाले होते की.प्रकाश आंबेडकर यांना कसे माहित की.निवडणूक पूर्वी देशात जातीय दंगली घडतील.त्यामुळे त्यांची चौकशी करावी आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावं.यावर प्रकाश आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया देत, त्यांच्यावर टीका केली.
दरम्यान सरसंघचालक मोहन भागवत यांना लक्ष्य करत आंबेडकर म्हणाले की,आरएसएसने त्यांची हत्यारे कुठे- कुठे आहेत याची यादी जाहीर करावी . मोहन भागवत यांच्याकडे AK 47 आहे, हे मला माहीत आहे.ते म्हणाले," हे शस्त्र कशासाठी यांचा खुलासा करा . तुम्ही युद्ध कोणाशी करणार आहात ? तुम्हाला आम्ही जाहीर आवाहन करतो, या शस्त्राचा पाकिस्तान मध्ये जाऊन उपयोग करा." यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की मोहन भागवत यांना कधी कधी संविधानवादी आहे.असं सांगावं लागतं पंतप्रधान मोदी विषयी बोलताना ते म्हणाले, मोदींनी माझी प्राॅपट्री शोधायचा अनेकदा प्रयत्न केला . पण मी फकीर आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.