Politiks : दिल्ली सेवा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी!

पुणे दिनांक १२ ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) बहुचर्चित दिल्ली सेवा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी केली आहे.आता हे विधेयक मंजूर केले गेले आहे.त्यामुळे दिल्ली मधील अधिकारी यांच्या बदल्या व पोस्टिंग अधिकाराशी संबंधित असलेले ' दिल्ली सेवा बिल ' लोकसभेत आवाजी मतदानाना नंतर मंजूर करण्यात आले होते.ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत विधेयक मांडले होते.त्यावेळी मतदान यंत्रांत तांत्रिक अडचणी मुळे सभापती यांनी चिठ्ठी द्वारे मतदान प्रक्रिया राबविली होती.लोकसभा नंतर राज्यसभेत देखील हे बिल पास झाले होते.
त्यानंतर ते ' दिल्ली सेवा विधेयक बिल ' राष्ट्रपती यांच्या कार्यालयात स्वाक्षरी साठी पाठविण्यात आले होते.आता या दिल्ली सेवा बिल या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली असून आता या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे.व या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.