काॅग्रेस जनसंवाद पदयात्रा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ९ वर्षात देशावर १०० लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर उभारला - नाना पटोले

पुणे दिनांक ८ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) भारत स्वतंत्र्या नंतर काॅग्रेसच्या सरकारने देशात सुईपासून राॅकेट प्रर्यतचा विकास केला.चंद्रावर चांद्रयान- ३ सोडले त्या इस्त्रोची स्थापना सुध्दा काॅग्रेस सरकारच्या काळातच झाली २०१४ साली भाजपाचे सरकार हे सत्तेवर आले पण या सरकारने मागील ९ वर्षात नवीन काहीच उभे केले नाही.उलट काॅग्रेस सरकारने उभे केलेल्या बॅका रेल्वे.विमानतळे.व विमा कंपन्या विकून टाकल्या देश स्वतंत्र झाल्यापासून ६७ वर्षात सर्व सरकारने मिळून ५५ लाख कोटी रुपयांचे कर्ज काढले पण मोदी सरकारने मागील ९ वर्षात तब्बल १०० लाख कोटी रुपयांचे कर्ज करून ठेवले आहे.असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
दरम्यान प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली कन्हान जिल्हा नागपूर येथे जनसंवाद पदयात्रा काढण्यात आली यावेळी माजीमंत्री सुनील केदार.माजी मंत्री जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र मुळक.उपाध्यक्ष नाना गावंडे व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.काॅग्रेस प्रदेशाध्यक्षांची पारशिवनी येथे जाहीर सभा झाली त्यावेळी ते पुढे म्हणालेकी केंद्रातील तानाशाही सक्षकआरच्यआ विरोधात ही लढाई सुरू आहे.मोदी सरकारने प्रचंड वाढविली आहे.औषधे महाग केली शेतीला लागणाऱ्या साहित्यावर १८ टक्के जीएसटी लावून शेतकऱ्यांना लुटलं शेतकरी व कष्टकरी.सामन्य माणसांकडून पैसे काढून त्यांच्या मित्रोंच्या खिसे भरत आहेत.मोदी सरकार सत्तेवर येताच संविधानाच संपावयाला निघाले.जनतेशी सुरू असलेला हा संवाद थांबणार नाही १२ तारखे प्रर्यत जनसंवाद यात्रा सुरू राहणार आहे.असे नाना पटोले हे यावेळी म्हणाले आहेत
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.