राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया : पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच शरद पवारांना शेती व विकासासाठी पद्मविभूषण दिलं! सुप्रिया सुळे यांनी मोदींच्या टिकेनंतर केला पलटवार

पुणे दिनांक २७ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथील शेतकरी मेळाव्यात नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचे गुऱ्हाळ मोठ्या प्रमाणावर सुरू झाले.दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार हे पहिंल्यांदा केंद्रातील सत्तामध्ये आल्यावर त्यांनी बारामतीत आले होते व त्यांनी शरद पवार हे आपले गुरू आहेत.असे त्यांनी सांगितले होते.आता त्यांनीच पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.शरद पवार हे कृषीमंत्री असताना महाराष्ट्रातील नेते मंडळींनी शेतकरी वर्गाच्या साठी काय केलं? असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना मोदी म्हणाले की.२०१४ च्या साली आधी फक्त भ्रष्टाचारांचे आकडे यायचे.त्यांच्या या टीकेवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यापुढे म्हणाल्या की ' आपल्या सर्वांच्या लक्षात आले असेल की याच मोदी सरकारने शरद पवार यांना त्यांच्या शेती आणि विकासाच्या कार्याबद्दल पद्मविभूषण दिलं आहे ' असे त्या म्हणाल्या आहेत.अशी प्रतिक्रिया देत मोदींच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.