महाराष्ट्रात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीचे मराठा आरक्षण बाबत मौन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्षत्रिय व गरीब मराठा समाजाची गरज नाही हे आज कळलं,आमची लढाई आम्हीच लढू.मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार

पुणे दिनांक २६ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्षत्रिय मराठा व गरीब मराठा समाजाची गरज राहिलेली नाही.आता आमच्या आरक्षणांची लढाई आम्हीच लढू उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.शिर्डी दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात मराठा आरक्षणांचा कोणताही उल्लेख न केल्यांने मराठा आरक्षण आंदोलंकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिके बद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान या संदर्भात पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे की. महाराष्ट्रात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरकारला सांगू शकत नसतील तर तेथून दिल्लीतून काय सांगणार.असा सवालच त्यांनी यावेळी केला.आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरीबांचे प्रश्र्न सोडवतील असा गैरसमज होता.तो आता दूर झाला.त्यामुळे ते गरीबांचे ऐकणारे पंतप्रधान आहेत.हा आता गैरसमज दूर झाला आहे.असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गोरगरिबांच्या मुलांसाठी विनंती केली होती.मात्र याविषयी नरेंद्र मोदी यांनी आरक्षण संदर्भात भाष्य केले नाही. दरम्यान मराठा समाजांने ठरवले असते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येऊ दिले नसते.पंतप्रधान मोदी बोलले नाही हे बरे झाले. यावरुन समजते की त्यांना आता गोरगरिबांची गरज नाही.त्यामुळे आम्ही आता आमची लढाई आम्हीच लढणार असल्याचा एल्गार मनोज जरांगे पाटील यांनी केला.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.