Politiks : ' विरोधकांच्या एकजुटी मुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी अस्वस्थ ' शरद पवार

पुणे.दिनांक २९.जून ( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम ) ' देशभरात विरोधी पक्षाच्या एकजुटी मुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी अस्वस्थ आहेत .त्या मुळे ते पदाला न शोभणारे वक्तव्य करत आहेत. पंतप्रधान पद. संसदीय सदस्य ही एक संस्था आहे. त्या मुळे त्या पदाचा मान ठेवला पाहिजे .याची काळजी मोदीने घ्यायला हवी , असे मत शरद पवारांनी मांडले आहेत. दरम्यान देशातील सर्व विरोधकांची पुढील बैठक १३ व १४.जुलै रोजी बंगळुरू येथे होणार आहे.अशीही माहीती त्यांनी या वेळी दिली आहे.
या वेळी समान नागरी कायद्या बाबत पवार म्हणाले समान नागरी कायदा लागू करण्या संदर्भात सध्या देशात चर्चा सुरू असताना आणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या विषयी वक्तव्य केल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्ही या प्रकरणी योग्य वेळी भूमिका जाहीर करू .असे आज स्पष्ट केले आहे.या कायद्या बाबत शीख व जैन समाजाने आपली भूमिका जाहीर करावी . निती आयोगा समोर अनेक प्रस्ताव आले आहेत. त्या विषयी माहिती समोर यावी. असे जेष्ठ नेते पवार म्हणले. पुढे बोलतांना पवार म्हणाले राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. महाराष्ट्रा समोर अनेक प्रश्न आहेत सध्या महिलांवरील हल्ले व बेपत्ता मुलींचा प्रश्न असून हा कायदा सुव्यवस्थेवर बोट ठेवणारा आहे. गेल्या सहा महिन्यांत ठाणे. मुंबई. पुणे. व सोलापूर मधून २.हजार ४५८.महिला बेपत्ता झाल्या असल्याचे शरद पवार पवारांनी सांगितले. राज्यातील गृहमंत्र्यांनी सर्वात अधी या महिलांचा शोध घ्यावा आणि नंतर बाकीचे वक्तव्य करावीत. असे टीकास्त्र पवारांनी देवेंद्र फडणवीसांवर सोडले.
तर पुढे बोलतांना पवार म्हणाले की. " गुगली बाॅलवर विकेट दिली तर का घ्यायची नाही? "दरम्यान जेष्ठ नेते शरद पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलाच कलगी तुरा रंगला आहे. पहाटेच्या शपथविधीवर उत्तर देताना पवार म्हणाले की " तुम्हाला जो अर्थ काढायचा तो काढा. तो डाव होता कि नाही तेही जाऊ द्या .माझे सासरे होते सदु शिंदे ते गुगली बाॅलर होते.त्यांनी अनेक दिग्गजांच्या विकेट काढल्या. मी क्रिकेट खेळत नाही .पण गुगली कसा टाकायचा हे मला माहीत आहे.त्यांनी विकेट दिली तर घ्यायचीच. गुगलीवर विकेट कोण सोडणार. "असे पवार यांनी सांगितले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.