खासदार सुप्रिया सुळे यांची संसदेत मागणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सिंचन घोटाळा व बॅकेची चौकशी करावी

पुणे दिनांक १८ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील ७० हजार रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस वर केला होता.आज तोच धागा पकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७० हजार रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी करावी व एका बॅक घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी आज संसदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ जुलैला आरोप करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ७० हजार रुपयांचा महाराष्ट्रात सिंचन घोटाळा केला आहे.व महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बॅकेबाबत देखील उल्लेख केला होता.व त्यांच्या आरोपानंतर काहीच दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ४० आमदार सोबत घेऊन भाजप बरोबर सत्तेत सहभागी झाले आहेत.आता तोच धागा पकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी आज संसदेत केली आहे.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्या नंतर जेष्ठ नेते शरद पवार यांचा राजकीय प्रवास वेगळा आहे.व उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांचा राजकीय मार्ग वेगळा आहे.त्यामुळे आता सुप्रिया सुळे या चौकशीची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे करून एक प्रकारे अजित पवार यांना चांगलेच घेतल्याचे एकंदरीत दिसत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.