Rahul Gandhi Press Conference : राहुल गांधी यांचा राजकीय आरोपांचा मोठा बाॅम्ब, अदानी व मोदी यांच्यावर निशाणा

पुणे दिनांक ३१ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आज इंडिया आघाडीची मोठी सर्व पक्षांची बैठक होत असून याबैठीकी साठी काॅग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी हे देखील मुंबई मध्ये दाखल झाले आहेत . बैठक सुरू होण्यापूर्वीच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन यात त्यांनी धक्कादायक माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.यावेळी त्यांनी देशातील दोन मोठ्या प्रसिद्ध आर्थिक वृत्तपत्रात मोदी व आदानी कुंटुबांशी संबंधीत आहे.आपल्या शेअर्समध्ये सिक्रेटली शेयरमध्ये गुंतवणूक केली आहे.या परिवाराने आपले पैसे गुंतवले आहे.असं द गार्डियनमध्ये म्हटलं आहे.तर अन्य दुसऱ्या फायनन्शियल टाईम्स वृत्तपत्रात म्हणले आहे.१ मिलियन डॉलर भारतामधून अदानींच्या कंपनीच्या नेटवर्ककडून वेगवेगळ्या देशात गेला व देशात आला.त्यातून अदानी यांनी आपल्या शेयर्सची किंमत वाढवली.व त्याच किंमतीच्या फायद्यातून अदानी विमान.पोर्ट विकत घेत आहेत.व त्यांना महाराष्ट्रातील धारावीत मोठा प्रोजेक्ट मिळाले आहेत.
दरम्यान यावेळी बोलताना ते म्हणाले की.अदानी यांना या पैशातून शेअर्सच्या किंमती फुगवून मिळवत आहेत. हा पैसा जो वापरला जातोय तो कुणाचा आहे.? अदानींचा आहे की दुसरा कुणाचा आहे.? यासर्व कामाचे मास्टर माईंड वािनोद अदानी आहेत.जे गैतम अदानी यांचे भाऊ आहेत .तर एकाचे नाव नासर शबान आली व दुसरा चिनी व्यक्ती आहे.भारतामधील इन्फ्रास्ट्रक्चर खरेदी करत आहेत तर चिनी व्यक्तीचा संबंध काय.? सदरचे पैसे भारताच्या शेअर मार्केट मध्ये कसा परिणाम करत आहे.? विषेश म्हणजे चिनी व्यक्तीची भूमिका काय आहे.? सेबीचा तपास झाला होता.ज्यांनी क्लिनचीट दिली.ज्याव्यक्तीने तपास केला.अदानींच्या चॅनलचे ते डिरेक्टर आहेत याचाच अर्थ हे एक नेटवर्क आहे.सेबीचा चेअरमन क्लीिनचीट देतो व नंतर अदानी यांच्या कंपनीत डायरेक्टर बनतो. आंतरराष्ट्रीय विषय आहे.या सर्व घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच का करत नाहीत.? नरेंद्र मोदी व अदानी यांचे नातं आहे.असं वृत्तपत्र म्हणत आहेत .काय नातं आहे.? ते त्यांनी जाहीर करावं .ईडी अदानी यांच्या वर रिसर्च का करत नाही? हा मोठा सवाल आहे.व भारत देशाच्या इभ्रतीचा विषय आहे.असे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.