मुंबई - गोवा महामार्गावरील खड्डे : ' वर्षांनुवर्षे मुंबई - गोवा महामार्गावरील रस्ता का होत नाही ', राज ठाकरेंचा राज्य सरकारवर निशाणा

पुणे दिनांक २७ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम ) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर चांगलाच आज निशाणा साधला आहे.' वर्षांनुवर्षे रस्ता का होत नाही ', विषय होता मुंबई - गोवा महामार्गाच्या प्रश्न वरुन बोलताना ते म्हणाले " नितीन गडकरी हे त्यावेळी पीडब्लूडी खात्यांचे मंत्री होते.त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई - पुणे रस्ता झाला.त्यावेळी आपल्या देशाला कळलं, असा रस्ता होऊ शकतो व मग देशात चांगले रस्ते होण्यास सुरुवात झाली.ज्या महाराष्ट्राने हा आदर्श घालून दिला.त्याच महाराष्ट्रातील मुंबई - गोवा रस्ता हा असा आहे",असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान या रखडलेल्या मुंबई - गोवा महामार्गासाठी मनसेच्या वतीने जागर यात्रा आज पहाटे पासून काढण्यात आली आहे.यातच कोकणातील कोलाड येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत राज ठाकरे हे बोलत होते.ते पुढे बोलताना म्हणाले की." हा रस्ता असा का आहे?यावरच असे खड्डे का आहेत.? १७ वर्ष झाली.हा रस्ता का होत नाही." सरकारला धारेवर धरतांना राज ठाकरे म्हणाले की." सरकारला जाग यावी म्हणून तुम्ही सगळ्यांनी पदयात्रा केलीत.पद यात्रा हा सभ्य मार्ग असतो.आपल्या पक्षाचं तसंच धोरण आहे.पहिल्यांदा हात जोडून आणि नंतर हात सोडून बोलायचं असतं ". बोलताना राज ठाकरे हे पुढे म्हणाले " ज्या - ज्या महाराष्ट्र सौनिकांनी आणि कोकणी बांधवांनी पदयात्रेत सहभाग नोंदवला. त्यांचे मी आभार मानतो.अमित आणि पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी परिश्रम घेतले आहेत.कोकणी बांधवांना व भगिनींनी मागील अनेक वर्षांपासून रस्त्यांवरील खड्डे सहन करावे लागत आहेत.याचा राग कसा येत नाही.? असे ते म्हणाले.हा रस्ता असा ठेवण्यामागे सगळयात महत्त्वाचं कारण कोकणी बांधवांच्या जमिनी विकत घेतल्या जात आहेत.ज्यावेळी रस्ता होईल तेव्हा शंभर पट भावाने व्यापाऱ्यांना जमिनी विक्री होतील.तुम्हाला काहीही मिळणार नाही.रस्ता झाल्या नंतर चांगला झाल्यानंतर आजुबाजूच्या जमिनींचे भाव काय होतात? हे समजून घ्या.जमिनी विकू नका.तशाच ठेवा पुढे तुम्हाला फायदा होईल." असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.