माजी राष्ट्रपती : ' वन नेशन.वन इलेक्शन ' समितीच्या अध्यक्षपदी रामनाथ कोविंद

पुणे दिनांक १ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) ' वन नेशन.वन इलेक्शन ' साठी केंद्र सरकारने निर्णय घेतला असून या करिता केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली आता ' वन नेशन.वन इलेक्शन ' कायद्यावर काम करण्यासाठी समितीची स्थापना केली आहे.या बाबत ' टाइम्स ऑफ इंडिया ' ने वृत्त दिले आहे.दरम्यान ' वन नेशन.वन इलेक्शन ' म्हणजे लोकसभा निवडणूका व विविध राज्यांतील विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची कल्पना आहे.या बाबतीत अनेकदा कल्पना मांडल्या गेल्या आहेत.व यांवर भारतीय कायदा आयोगा मार्फत या साठी अभ्यास झाला आहे.
कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या वतीने संसदेचे पाच दिवसीय विषेश अधिवेशन दिनांक १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत अधिवेशन होणार आहे.हे अधिवेशन म्हणजे लोकसभा निवडणुकीची दिशा ठरणार आहे.? अशी चर्चा सर्वंच पक्षात सुरू आहे.व यांचं वेळी ' वन नेशनल.वन इलेक्शन ' हे विधेयक यावेळी मांडण्यात येण्याची शक्यता आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.