Politiks : अमरावतीत राणांचे ' हनुमान चालिसा पठण 'तर ठाकरे यांचे विदर्भ मिशन पोलीसांचा तगडा बंदोबस्त

पुणे दिनांक १० ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) उद्धव ठाकरे हे काल पसून विदर्भ दौराकरत असून राणांनी याच पार्श्वभूमीवर हनुमान चालिसा पठणाचे पोस्टर लावले आहे. तर काल उध्दव ठाकरे गटाचे कार्यकर्तानी आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी लावलेले पोस्टर फाडले. त्या नंतर राणांचे कार्यकर्ते यांनी उध्दव ठाकरे यांच्या स्वागाताचे पोस्टर फाडले. या पार्श्वभूमीवर अमरावती मध्ये राजकीय वातावरण तापले आहे. व ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी हनुमान चालिसा पठण करण्यास पोलीसांनी राणां दांपत्याला परवानगी नाकारली आहे.
पोलीसांनी राणां यांच्या काही कार्यकर्ते यांना ताब्यात घेतले आहे. त्या नंतर राणां यांनी आपल्या कार्यकर्तेना बेकायदेशीर रित्या मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला. राणांचे कार्यकर्ते ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी हनुमान चालिसा पठण करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. त्या मुळे अमरावतीत सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.