Politiks : ' स्वाभिमानी ' मध्येच राहणार नाराजीच्या मुद्यावरून रविकांत तुपकर यांची भुमिका

पुणे दिनांक ८ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर हे राजू शेट्टी यांच्यावर नाराज असल्याची चर्चा सुरू आहेत.यावर बोलताना तुपकर म्हणाले माझी नाराजी व्यक्तिगत नाही हा संघटनेचा प्रश्न आहे.याबाबत सर्व गोष्टी मी राजू शेट्टींच्या कानावर घातले आहे.मी संघटनेत राहून काम करणार आहे अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
मी या समितीच्या बैठकीला हजर राहणार नाही या संदर्भात मी अधीच सांगितले आहे.आता निर्णय तुम्ही घ्यायची आहे.मी कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाही.या सर्व काल्पनिक बातम्या पसरल्या जात आहे.मी चळवळ मधील कार्यक्रता आहे.आणी मी स्वाभिमानी संघटना मध्येच राहून काम करणार आहे.असे ते म्हणाले.मी शेतकरी वर्गासाठी लढणार आहे.ते पंढरपूर येथे विठ्ठल रखुमाईच्या दर्शना साठी आले होते.त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.दरम्याण ते पुण्यात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.