मुख्यमंत्र्यांनी घेतले भीमाशंकरांचे दर्शन : बळीराजावरचे संकट दूर कर , राज्यभरात चांगला पाऊस पडू दे - मुख्यमंत्र्यांच्ये भीमाशंकर चरणी साकडं

पुणे दिनांक ११ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आज श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाची विधीवत पूजा करून दर्शन घेतले व बळीराजावरचे संकट दूर कर. महाराष्ट्र राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस पडू दे राज्य वरचं संकट दूर होऊन राज्य सुजलाम सुफलाम होऊदे ; राज्यातील सर्व घटकांना सुख समाधान आणि आनंद मिळू दे असं साकडं भगवान श्री भीमाशंकराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घातलं आहे.
दरम्यान पूजा नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.यावेळी खासदार श्रीकांत शिंदे.व पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख.पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल.माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील.माजी आमदार शरद सोनवणे.आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मोठ्या प्रमाणावर भाविक श्रद्धेने व भक्तीभावाने येथे दर्शनासाठी येत असतात.मीदेखील दरवर्षी प्रमाणे यावर्षी श्रावण सोमवार असल्यामुळे दर्शनास आलो आहे.याठिकाणी लाखो भक्त येत असल्याने शासनाने १४८ कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे.आता प्रर्यत त्यातील ६८ कोटी रुपये विविध सुविधावर खर्च करण्यात आले आहे.येथे येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून मुलभूत सुविधा शासनाच्या माध्यमातून दिले जातील या परिसरातील स्वच्छाता व पिण्याचे पाणी स्वनगृह व्यवस्था करण्याचा तसेच आदिवासी पाड्यातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे सुचना प्रशासनाला दिल्या आहेत.असेही ते म्हणाले.
दरम्यान याप्रसंगी जुन्नर आंबेगावचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे खेडचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे तहसीलदार तथा देवास्थानचे कार्यकारी विश्वस्त संजय नागटिळक.श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष अॅड सुरेश कौदरे.व विश्र्वस्त मधुकर गवांदे दत्तात्रय कौदरे.रत्नाकर कोडीलकर आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पूजा सुरू असताना भाविकांच्या दर्शनात कोणत्याही प्रकारचा खंड न पडता भाविकांचे दर्शन देखील अखंडपणे सुरू होते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.