Politiks : नाशिक मधील तलाठी पेपर फुटल्या प्रकरणी रोहित पवार यांनी सरकारला फटकारले

पुणे दिनांक १७ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) तलाठी भरतीसाठी आजपासून सर्वत्रच परीक्षा केंद्रावर परीक्षा चालू आहे.आज नाशिक येथे पेपर फुटल्याचे समोर आले आहे.या वरुन आमदार रोहित पवार यांनी म्हटले की युवा वर्गाने ठरवले तर या सरकारला माहागात पडेल...असा इशाराच त्यांनी देत सरकारला चांगलेच फटकारले आहे.
दरम्यान आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात तलाठी पदाच्या भरतीसाठी परीक्षा होत आहेत.ही परीक्षा एक महिना भर चालू असणार आहे. आज परीक्षांचा पहिलाच दिवस आहे.आणी आज " नागपूर व नाशिक येथे पेपर फुटल्याचा घटना समोर आली आहे.नोकरीच्या अपेक्षेने सर्व सामान्य कुटुंबातील मुलं व मुली मोठ्या कष्टाने व मेहनतीने परीक्षा साठी अभ्यास करतात परंतु शासनाच्या निष्काळजीपणा मुळे पेपर फुटी होते.व सर्व युवक व युवती यांच्या स्पवप्नांवर पाणी फिरवलं जातं.वन विभागाच्या परीक्षांचे पेपर फुटल्या नंतर अधिवेशनात आवाज उठवला असता गृहमंत्री महोदयांनी पेपर फुटल्याचा बातम्या खोट्या असल्याचे सांगत राज्याची दिशाभूल केली होती.गृहमंत्री महोदयांनी तेंव्हाच कणखर भूमिका घेतली असती तर आता पेपर फुटले नसते.युवाच्या प्रश्नांवर शासन दुर्लक्ष करणार असेल तर नाईलाजाने आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि हा युवा वर्ग # seriuous झाला तर सरकारला खूप महाग पडेल.त्यामुळे पेपरफुटी होणार नाही याकडं शासनाने लक्ष द्यावे, ही कळकळीची विनंती,!" असे ट्विट रोहित पवार यांनी करून राज्य सरकारला फटकारले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.