Rutuja latke : पोट निवडणूक लढविणार मशाल चिन्हावरच ऋतुजा लटके यांचे विधान

अंधेरी पोट निवडणुकीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार यांनी उद्धव ठाकरे गट व एकनाथ शिंदे गट या दोन्ही गटाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर लटके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी पोट निवडणूक लढविणार ती मशाल या निवडणूक चिन्हावरच. माझ्यावर अन्य कोणाच्या गटाचा दबाव नाही. यावेळी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
त्यांनी एक मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या की." माझ्यावर कोणताही दबाव नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलेली नाही. व अंधेरीतील पोटनिवडणूक मी मशाल या निवडणूक चिन्हावरच लढविणार आहे." व " आमची जी निष्ठा आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सोबतच आहे. मी महापालिका आयुक्तांची भेट घेणार आहे व माझ्या राजीनाम्याबाबत पुन्हा एकदा त्यांना विनंती करणार आहे की. माझा राजीनामा आजची आज त्वरित घेण्यात यावा ." असेही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.
दरम्यान राजीनामे बाबत." बोलताना त्या म्हणाल्या की. मला अशी माहिती देण्यात आली आहे की. सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. फक्त एक सही शिल्लक राहिली आहे." यावेळी बोलताना त्यांनी अशी माहिती ऋतुजा लटके यांनी दिली आहे. तसेच त्यांनी पुन्हा एकदा पुनर्विचार केला आहे की. मी निवडणूक लढविणार ती मशाल या चिन्हावरच. त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.