बारामती नंतर आता काष्टीत काका विरोधात पुतण्या : काष्टीचे साजन पाचपुते आज करणार ठाकरे गटात प्रवेश; पक्ष देणार मोठी जबाबदारी

पुणे दिनांक ४ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) भाजपचे ज्येष्ठ नेते व अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील आमदार बबनराव पाचपुते यांचे सख्खे पुतणे साजन पाचपुते हे आज मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सांयकाळी पाच वाजता मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन पक्ष प्रवेश करणार आहेत.त्यामुळे बारामती नंतर आता श्रीगोंदा तालुक्यातील काष्टीत काका विरुध्द पुतण्या अशी मोठी राजकीय लढाई पाहण्यास मिळणार आहे.साजन यांच्या वर मोठी जबाबदारी शिवसेना देणार आहे.तसेच साजन यांच्या रूपाने शिवसेनेची मोठी ताकद अहमदनगर जिल्ह्यातील ताकद मात्र मोठ्या प्रमाणावर आहे.
दरम्यान साजन पाचपुते यांनी काष्टी गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत साजन पाचपुते विरुद्ध आमदार बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव व साजन यांचे सख्खे चुलत भाऊ प्रतापसिंह पाचपुते अशी लढत झाली होती.यात साजन यांनी काकाला गावातच व घरातच चांगली टक्कर देऊन काष्टी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेऊन काकाला धोबीपछाड दिलेली आहे.कालातराने श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांनी काकाला चांगली टक्कर देत ती देखील आपल्या ताब्यात घेतली आहे.पण त्यांनी आतापर्यंत कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नव्हता. साजन पाचपुते यांचे वडील सदाआण्णा पाचपुते व बबनराव पाचपुते हे दोघेजण सख्खे भाऊ आहेत. मध्यंतरी सदाआण्णा पाचपुते यांचे निधन झाल्यानंतर पाचपुते यांच्या घरात वादाची ठिणगी पडून साजन यांनी राजकारणात आपली वेगळी भूमिका घेऊन ते राजकारण स्वबळावर करीत आहेत.
दरम्यान साजन यांचा राजकीय वेगळा गट करून काकांना राजकीय टक्कर देत आहेत.व त्यात त्यांनी श्रीगोंदा तालुक्यात यश मिळवले आहे.त्यांच्या पाठीमागे कार्यकर्ते यांची मोठी ताकद आहे.तालुक्यात त्यांच्या मागे मोठा मतदार वर्ग आहे.शिवसेना खासदार संजय राऊत यांचे ते मित्र आहेत.आज मुंबई मध्ये पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवर सांयकाळी पक्ष प्रवेश करणार आहेत.त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद मात्र वाढणार आहे.व पुन्हा काका विरुध्द पुतण्या अशी लढाई मात्र बारामती नंतर श्रीगोंदा तालुक्यात बघायला मिळणार हे मात्र निश्चित
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.