Sambhaji bhide controversial statement : संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य

पत्रकार रुपाली बडवे मंत्रालयात गेल्या होत्या. संभाजी भिडे मंत्रालयात आले असता त्यांनी त्यांना प्रश्न विचारला, गुरुजी, तुम्ही कोणाला भेटलात? त्यावर संभाजी भिडे म्हणाले की, “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे ( Controversial statement of sambhaji bhide ). भारत माता विधवा नाही”. यासंदर्भात प्रतिक्रियाही समोर आली आहे.
कोणत्याही स्त्रीला कसं जगावं हे कुणीच सांगू शकत नाही - अमृता फडणवीस
संभाजी भिडे गुरुजींबद्दल मला नितांत आदर आहे. ते हिंदू धर्माचे आधारस्तंभ आहेत. पण मला व्यक्तिशः असं वाटतं की कोणत्याही स्त्रीला कसं जगावं ( Controversial statement of sambhaji bhide ) हे कुणीच सांगू शकत नाही. तिची जीवनशैली आहे आणि तिचा आदर केला पाहिजे. असं म्हणत अमृता फडणवीस यांनी संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस हेही कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला आले आहेत. असे उत्तर अमृता फडणवीस ( Amruta Fadnavis ) यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
जर मला कुणी कुंकू किंवा टिकली लावण्याची सक्ती केली तर मी लावणार नाही - शालिनी ठाकरे
भिडे यांच्या या वक्तव्यानंतर सामजिक आणि राजकीय स्तरामधून प्रतिक्रिया उमटत आहेत. यादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी देखील प्रतिक्रीया दिली आहे. "मी कुंकू - टिकली लावते. गेल्या काही वर्षांपासून तर मोठे कुंकू लावते. कारण मला आवडते." असे म्हटले आहे. पुढे शालिनी ठाकरे ( Shalini Thakre ) म्हणाल्या की, "...पण उद्या जर मला कुणी कुंकू किंवा टिकली लावण्याची सक्ती केली तर मी लावणार नाही!"
भिडे गुरूजींची महिलांच्या वैयक्तिक जीवनात ढवळाढवळ - निलम गोऱ्हे
मंत्रालयामध्ये आज भिडे गुरूजींसोबत महिला पत्रकाराने बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ‘आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलीन’, असे म्हणत त्यांनी महिला पत्रकाराचा अपमान केला. महिलांच्या वैयक्तिक जीवनात ढवळाढवळ करणारे विचार भिडे गुरूजींनी मांडले आहेत. भारत माता कुमारिका असेल, विधवा असेल किंवा काहीही असेल तरी आपल्या भावनांशी निगडित आहे. त्यामुळे भिडे गुरूजींचे हे वक्तव्य निषेधार्ह आहे, असे शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) म्हणाल्या.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.