दुपारी ४ वाजता दिल्लीत निवडणूक आयोगा समोर सुनावणी : 'सांगा' राष्ट्रवादी पार्टी व घड्याळ कुणाचं? काकांचे की पुतण्याचे , निवडणूक आयोगा समोर सलग तीन दिवस सुनावणी

पुणे दिनांक २० नोव्हेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आज सोमवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता राष्ट्रवादी पार्टी व चिन्ह घड्याळ हे कुणाच्या पारड्यात जाणार याबाबत म्हत्वाची सुनावणी होणार आहे. दरम्यान मागील सुनावणीवेळी शरद पवार यांच्या गटाच्या वतीने युक्तिवाद वेळी अजित पवार गटाच्या वतीने बोगस प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप करण्यात आला होता.तो युक्तिवाद पूर्ण झालेला आहे.आज अजित पवार गटाच्या वतीने युक्तिवाद करण्यात येणार आहे.
दरम्यान आज दिल्लीत निवडणूक आयोगा पुढे सुनावणी असल्यामुळे जेष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे हे दिल्लीला कालच पुण्यातून रवाना झाले आहेत.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते अजित पवार हे भाजप सोबत गेल्याने ते आता शिंदे सरकार मध्ये सत्तेत आहेत .व त्यांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काही आमदार व खासदार कार्यकर्ते गेले आहेत.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत दोन गट पडले आहेत.एक गट शरद पवार व दुसरा गट अजित पवार.असे आहेत . शिंदे प्रमाणेच अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह घड्याळवर दावा केला आहे. हे प्रकरण आता निवडणुका आयोगा समोर आहे.व या आजच्या सुनावणीवर सर्वच भारतीय नागरिकांचे व इतर पक्षांचे व राष्ट्रवादी मधील दोन्ही गटांचे लक्ष लागले आहे. दरम्यान ही सुनावणी आज दुपारी ४ वाजता दिल्लीत निवडणूक आयोगा समोर होणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.