Warrent against Sanjay Raut : कारागृहातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत पुन्हा अडचणीत, न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीच्या सुनावणीला उपस्थित न राहिल्याबद्दल मुंबईतील एका न्यायालयाने शुक्रवारी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले.मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती.
शिवडी महानगर दंडाधिकाऱ्यांनी तक्रारदाराचे म्हणणे नोंदवून हे वॉरंट जारी केले व पुढील सुनावणी २४ जानेवारी रोजी ठेवली. न्यायालयाच्या आदेशानंतरही राऊत हजर झाले नाहीत, असे मेधा सोमय्या यांच्या वकिलांनी सांगितले.
मुंबईजवळील मीरा भाईंदर परिसरात सार्वजनिक शौचालयाच्या बांधकाम आणि देखभालीशी संबंधित १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात राऊत यांनी बिनबुडाचे आणि बदनामीकारक आरोप केल्याचा दावा सोमय्या यांनी न्यायालयात केला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.