Politiks : ' भगतसिंह कोश्यारींना मणिपूरात पाठवा ; उध्दव ठाकरेंचा भाजपला खोचक सल्ला

पुणे दिनांक २९ जुलै ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) " आपल्या देशात मणिपूरमध्ये जे दोन महिलांसोबत करण्यात आलं , ते व्हिडिओ समोर आलं म्हणून माहित झालं तेथील मुख्यमंत्री म्हणतात अशा ब-याच घटना घडल्याआहेत. असे बोलतांना त्यांना लाज कशी वाटत नाही. राष्ट्रपती या महिला आहेत. त्या काय करत आहेत.असं उध्दव ठाकरे म्हणाले आहेत. आज ठाणे येथील गडकरी रंगायतन नाट्यगृहात ठाकरे गटाचा हिंदी भाषिक मेळावा पार पडला .या मध्ये ते बोलताना ते असं म्हणाले आहेत. ते म्हणाले की. मणिपूर मधील राज्यपाल या महिला आहेत. तरी त्या काहीही करत नाही आहे. आमच्या इथे जे राज्यपाल ( माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी) होते. ते कशी कृती करत होते. पाठवा त्यांना तिथे.
या मेळाव्यात बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की " आज हा जोश बघून लोकांनचे होश उडाले असतील .ठाणे म्हणजे असली शिवसेना .आजकाल मार्केट मध्ये चायनीज माल येतो .देवाच्या मूर्त्यापण येत असतील असे काहींचे देवही नकली आहेत."ते म्हणाले त्यांना वाटते आपण शिवसेना पेक्षा मोठे आहोत पण ते मोठे होऊ शकत नाही ते असेच वर जातील मी आव्हानाला कधी आव्हान मानत नाही संधी मानतो."
उध्दव ठाकरे म्हणाले " परिक्षा तभी होती है जब कठीण समय आता है.जेव्हा लढाईची वेळ येते तेव्हा खरे सैनिक बरोबर असतात. शिवसेने उत्तर भारतीयांसाठी काय केलं ? असं विचारलं जातं पण केलं नसतं तर तुम्ही इथं आलाच नसता ."ते पुढे म्हणाले " मी कोणाहीसोबत भेदभाव केला नाही हे मी तुम्हाला लिहून देतो. मला जे काय करायचं होतं ते मी कोरोनाच्या काळात केलं.माझं सौभाग्य आहे की महाराष्ट्राची जनता मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानते."
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.