Politiks : जेष्ठ नेते शरद पवार व ममता बॅनर्जी हे विरोधकांच्या 'डिनर ' साठी उपस्थित राहणार नाहीत

पुणे दिनांक १७ ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) कर्नाटक मधील बंगळुरू येथे आज पसून चालू असून पाटण्या नंतर ही दुसरी फेरी होत आहे. या मध्ये सर्व विरोधक एकत्र येत आहेत. दिनांक १७ व १८ होत आहे. या बैठीकेचे आयोजन काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी डिनरचे आयोजन केले आहे. या ' डिनर ' पार्टीला जेष्ठ नेते शरद पवार व ममता बॅनर्जी हे आज उपस्थित राहणार नसून हे दोन्ही नेते उद्या उपस्थित राहणार आहेत.
या डिनर पार्टी व उद्या होणा-या बैठकी कडे सर्व जणांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत २४ राजकीय पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत अजेंडा आणी संपूर्ण कार्यक्रम देखील निश्चित करण्यात आला आहे. मात्र यावर सध्या अशी चर्चा सुरू आहे.पण जेष्ठ नेते शरद पवार व ममता बॅनर्जी हे आजच्या ' डिनर 'पार्टीला उपस्थित राहणार नाही. या मुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. तर यावर दोन्ही नेत्यांनी स्पष्ट करण्यात आले आहे की ते उद्या या बैठकीत सहभागी होणार आहे. तसेच आज उध्दव ठाकरे व अदित्य ठाकरे हे आज दुपारी २ वाजता या बैठकी साठी रवाना होणार आहेत .
दरम्यान अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पळविण्याचा प्रयत्न झाला आहे. व त्यातच आज पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे.जेष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षात बंड झाल्यांने अधिवेशनात त्यांच्या सोबतचे आमदार काय भूमिका घेणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्या मुळे शरद पवार हे आमदारांची बैठक बोलवणार आहेत .अशी माहिती सूत्रांनच्या द्वारे कळत आहे. त्या मुळे जेष्ठ नेते शरद पवार हे उद्या बंगळुरू येथे बैठकी साठी जाणार आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.