Politiks : शरद पवार -अजित पवार व जयंत पाटील या तिघांची पुण्यात उद्योगपती चोरडिया यांच्या बंगल्यात गुप्त भेट

पुणे दिनांक १२ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात आज एक मोठया राजकीय घडामोडी घडल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जेष्ठ नेते शरद पवार व महाराष्ट्र राज्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार व जंयंत पाटील या तिघांन मध्ये अतिशय गुप्त बैठक बांधकाम व हाॅटेल क्षेत्रातील मोठे व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या कोरेगाव पार्क येथील निवासस्थानी झाल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटी नंतर ही काका पुतण्याची पहिलीच भेट आहे.
दरम्यान सदरची गुप्त बैठक बांधकाम व्यावसायिक व हाॅटेल क्षेत्रातील मोठे व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या कोरेगाव पार्क लेन नंबर तीन मधील निवासस्थानी आज दुपारी झाली आहे.या बैठकीत जयंत पाटील यांच्या मध्यस्थीने अजित पवारांनी शरद पवार यांनी सत्ता मध्ये सहभागी व्हावे यासाठी प्रस्ताव दिला होता.यामध्ये तिंघामध्दे जवळ पास साडेतीन तास बैठक झाली.पंरतू सदरच्या बैठकीत अजित पवार यांचा प्रस्ताव शरद पवार यांनी फेटाळला असून ते स्वतः याबाबत दोन ते तीन दिवसांत माध्यमा समोर आपली भूमिका मांडणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांन द्वारे माहिती मिळत आहे.आज तिन्ही नेते पुण्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांन साठी पुण्यात होते.
दरम्यान या बैठकी बाबत अधीच नियोजन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.सदरची बैठक ही हाॅटेल मध्ये होणार होती.परंतू बैठकी बाबत कुठेही वाच्यता होऊ नये म्हणून.हाॅटेल मधील ही बैठक गुप्त पणे बांधकाम व हाॅटेल व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या कोरेगाव पार्क येथील निवासस्थानी ठेवण्यात आली होती.अजित पवार हे चांदणी चौकातील कार्यक्रमा नंतर त्वरित शासकीय रेस्ट हाऊस येथे दाखल झाले व तेथून प्रायव्हेट वाहणांने कोरेगाव पार्क येथे दाखल झाले होते.व तेथील बैठकीनंतर ते मिीडियाला चकवा देत तेथून बाहेर पडले.पण त्यांची कार मिडीयांच्या काॅमेरा मध्ये कॅच झाली आहे.सदर बैठकीनंतर अजित पवार हे बारामतीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांन द्वारे मिळत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.