Sharad pawar : राष्ट्रवादीच ग्रामपंचायतीत पहिल्या नंबर वर पवारांनी आकडेवारी देऊन भाजपाचा फोडला ' फुगा ' !

तीन दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या ग्रामपंचायतंचा निकाल लागला होता. त्यावेळी भाजपाने आम्ही राज्यात मोठा विजय मिळविल्याचा दावा करीत होते व तशी आकडेमोड करीत आकडेवारी दाखवीत होते. मात्र आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार ( Sharad pawar ) यांनी आज आकडेवारीच जाहीर करून भाजपाचा ' गर्वाचा फुगाच फोडला आहे.
दरम्यान झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच पहिल्या क्रमांकावर आहे. असा दावाच पवारांनी पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी त्यांनी तशी आकडेवारी समोर मांडली आहे. निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतीच्या एकूण जागा ह्या ६०८. होत्या त्या पैकी राष्ट्रवादीला १७३. जागा मिळाल्या.तर काँग्रेस पक्षाला.८४. जागा मिळाल्या.व भाजप पक्षाला.१६८. जागा.एकनांथ शिंदे गटाला ४२. जागा मिळाल्या आहेत. परंतु यावेळी शिवसेनेची आकडेवारी मात्र पवारांनी सांगितली नाही.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना पवार ( Sharad pawar ) म्हणाले की आम्हाला माहित आहे. आमच्या किती जागा आहेत. त्यामुळे आम्ही आकडेवारी सांगितली आहे. असे म्हणत त्यांनी इतर पक्षाला वाटत आहे की. आम्ही जास्तीच्या जागा जिंकल्या. तर त्यांनी त्या आनंदातच राहावे. असा टोलाही पवार यांनी भाजपाचे नाव न घेता यावेळी लगावला आहे.व एक प्रकारे त्यांनी भाजपाचा ' फुगा ' त्यांनी यावेळी फोडला आहे. आता या सर्व घडामोडीनंतर भाजपा पवार ( Sharad pawar ) यांच्या या टीकेला काय उत्तर देणार हे लवकरच कळेल. परंतु ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीत. आघाडीने मात्र २७७. जागावर विजय मिळविला असून एकनाथ शिंदे गट व भाजपाला फक्त २१० जागाच मिळाले आहेत असे पवार ( Sharad pawar ) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.