Politiks : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते शरद पवार यांचा भाजपावर घणाघात

पुणे दिनांक १६ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी आज औरंगाबाद मध्ये भाजपावर चांगलाच घणाघात करून समाचार घेतला आहे.ते यावेळी म्हणाले की." भाजपा कडून निवडून आलेली हा कार्यक्रम चालू आहे.गोवा, मध्य प्रदेश,व महाराष्ट्रा मधील सरकार पाडले गेले आहेत.असे अनेक ठिकाणी प्रस्थापित झालेली सरकार पाडण्याचा कार्यक्रम मोदी सरकारच्या वतीने घेतला आहे," असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की." ईशान्य भारत हा देशाच्या व भविष्यांच्या सुरक्षाव्यवस्था दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा एक भाग आहे. पण आता मात्र त्या भागात ज्या काय घटना घडत आहेत.त्या खूप घातक आहेत.याचे उदाहरण म्हणजे मणिपूर हे एक उदाहरण आपल्याला घेता येईल.मात्र याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहा बाहेर फक्त तीन मिनिटे संसदे बाहेर थांबले व सभागृहात पाच मिनिटे बोलत होते.व इतर बाकीचे दोन तास ते राजकीय विषयांवर बोलले.पण मणिपूर मध्ये स्त्रियांची तिथे धिंड काढली जाते.व अत्याचार होत आहेत," असे शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.याबाबत बोलताना ते म्हणाले की." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट येथे लाल किल्ल्यावरून भाषण केले.मात्र त्यांनी यावेळी देंवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन घेतले असावे म्हणून ते म्हणाले मी परत येईन. त्यांना नाॅर्थ ईस्टमधील प्रश्र्न महत्त्वाचे वाटत नाही.मात्र मी पून्हा येईन हे मात्र सांगितले.योग्य लोकशाहीच्या पध्दतीने आम्ही NDA ला धडा शिकवू ," असे शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.