महाराष्ट्रातील राजकारणात होणार मोठी उलथापालथ : शरद पवार लवकरच भाजपाला महाराष्ट्राच्या विकासात आम्हाला साथ देतील प्रविण दरेकर यांचा मोठा गौप्यस्फोट

पुणे दिनांक १२ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे? भारतीय जनता पक्षाचे नेते प्रविण दरेकर यांनी एक मोठा गौप्यस्फोट करुन दावा केला आहे की. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे . लवकरच महाराष्ट्राच्या विकासामध्ये भाजप पक्षाला साथ देतील असे दरेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान पुढे बोलताना प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे की. जेष्ठ नेते शरद पवार हे राजकारणात खूप मोठे धुरंदर असे नेतृत्व असून व महाराष्ट्रात कधीही आवाज न करणारा फटका आहे.आणी तो 🎆 फटाका लवकरच फुटणार असा एक मोठा दावा त्यांनी केला आहे.दरम्याण आमदार रवी राणा यांनी देखील असाच दावा केला आहे की.शरद पवार यांना अनेक मान्यवर नेत्यांनी भाजप पक्षाला महाराष्ट्राच्या विकासासाठी साथ द्यावी अशी पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.व ते लवकरच महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपला पाठिंबा देतील असा दावा रवी राणा यांनी देखील केला आहे.दरम्यान याबाबत अजित पवार यांनी पुण्यात देखील शरद पवार यांची निवासस्थानी भेट घेतली होती.परंतू ही कुंटुबीक भेट होती असे पवार कुंटुबाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.परंतू पुणे भेटीनंतरच तातडीने अजित पवार.सुनिल तटकरे व पटेल यांनी तातडीने जाऊन अमित शाह यांची भेट घेतली होती.व ही भेट जवळपास ४० मिनिटे झाली आहे.पण या भेटी बाबतची चर्चा ही गुलदस्त्यात आहे. दरम्यान या भेटी नंतर मात्र महाराष्ट्रातील अनेक नेते मंडळी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. मात्र प्रविण दरेकर व रवी राणा यांच्या वक्तव्या नंतर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडणार असल्याचे बोलले जात आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.