Politiks : आज छगन भुजबळच्या बालकिल्यात येवल्यात शरद पवार यांची जाहीर सभा " मोठे पवार काय राजकीय बॉम्ब फोडतात "याची उत्सुकता

पुणे दिनांक ८ ( भरत नांदखिले यांच कडून ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांचेच पक्षातील सहकारी छगन भुजबळ यांच्या नाशिक जिल्ह्यातीलयेवला मतदार संघात भुजबळच्या बालकिल्यात होम ग्राउंड वर जाहीर सभा घेणार आहेत. त्या मुळे पवार आज येवल्यात " भुजबळ यांच्या वर काय राजकीय बॉम्ब फोडतात " या वर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान भुजबळ यांना सदर सभे बद्दल पत्रकारांनी त्यांना विचारले असता भुजबळ म्हणाले पवार यांचे माझ्या वर जास्त प्रेम आहे असे ते म्हणाले.
दरम्यान २जुलै रोजी महाराष्ट्रात खूप मोठी राजकीय खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण ९.जणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्या सरकार मध्ये हातमिळवणी करून त्यांच्या सरकार मध्ये मंत्री पदाची शपथ घेतली होती. या मुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले होते एक गट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे अजित पवार व दुसरा गट स्वता पक्षाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष असलेले जेष्ठ नेते शरद पवार यांचा गट दरम्यान त्याच दिवशी सकाळी स्वता पक्षाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष असलेले जेष्ठ नेते शरद पवार यांना छगन भुजबळ यांनी स्वता फोन केला व मी तिकडे काय गडबड चालू आहे बघून येतो असा फोन केला व तिकडे जाऊन भुजबळ यांनी डायरेक्ट मंत्री पदाची शपथ घेतली. या घडलेल्या सर्व राजकीय घडामोडी नंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
पत्रकार परिषदेत पवार म्हणाले मी नाशिक जिल्ह्यातील येवला मतदार संघातून जाहीर सभा घेऊन माझ्या सभेची मुहूर्तमोढ करणार आहे. व नंतर संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी सभा घेऊन संपूर्ण महाराष्ट्रपिंजून काढणार आहेत. मी अजून म्हतारा झालो नाही मी ठणठणीत आहे. मी अजून रिटायर्ड झालेलो नाही. वयाचा राजकरणांशी काहीही संबंध येत नाही. पवार यांच्या सभे बद्दलबद्दल पत्रकारांनी भुजबळ यांना विचारले असता भुजबळ म्हणाले पवार यांचे माझ्या वर जास्त प्रेम आहे. अशी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी भुजबळ यांना आम्ही परत येवल्यातून निवडून येवू देणार नाही असे म्हटले. या वर भुजबळ यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांनी सर्व प्रथम कुठून तरी निवडून यावे .मग आम्हाला सांगावे असे ते म्हणाले. भुजबळ आज नाशिक मध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहे. दरम्यान आज सोशल मिडीया वर शरद पवार यांच्या सभेचा टिर्जर लाॅच केला आहे. या सर्व घडामोडी वर पवार हे येवल्यात काय " राजकीय बॉम्ब फोडतात " हे पहाणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. व या वर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.