मुंबईतील शिवाजी पार्क येथील घटना : स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर राडा.शिंदे व ठाकरे गटाचे शिवसैनिक आमनेसामने

पुणे दिनांक १६ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक मोठी अपडेट हाती आली असून मुंबईतील शिवाजी पार्क येथे स्वर्गीय हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र अशा स्मृतीस्थळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री ऊध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे या दोन्ही गटांचे शिवसैनिक आमनेसामने आले असून दोन्ही गटाच्या शिवसैनिकांनी प्रचंड अशी घोषणाबाजी केली आहे.यात शेकडोंच्या संख्येने दोन्ही गटांचे शिवसैनिक जमा झाले होते.दरम्यान काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्मृतीस्थळावर फुलांच्या पाकळ्या बाळासाहेब यांच्या स्मृतीस्थळावर अर्पण करून त्यांना वंदन केले होते.यानंतर दोन्ही गटांचे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होऊन दोन्ही बाजूकडून यावेळी आमनेसामने येऊन प्रचंड प्रमाणावर घोषणाबाजी करत होते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.