Shivsena news : शिंदे गटाला काहीच अर्थ नाही सिब्बलांचा युक्तीवाद

खरी शिवसेना कुणाची यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. आज ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडणार आहेत. मागील सुनावणी वेळी शिंदे गटाच्या वतीने अँड. महेश जेठमलानी आणि अँड मनिंदर सिंह यांनी बाजू मांडली होती.
कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत. त्यांनी शिवसेनेतील संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी आयोगाकडे केली आहे. शिवसेनेतील हा फुटीर गट नाही. शिंदे गटाला काही अर्थ नाही. असा युक्तीवाद सिब्बल करत आहेत. ठाकरे गटाच्या वतीने खासदार अनिल देसाई उपस्थित आहेत. तर शिंदे गटाच्या वतीने खासदार राहुल शेवाळेही उपस्थित आहेत. शिवसेनेती फूट ही फक्त कल्पना आहे, असेही सिब्बल यांनी स्पष्ट केले आहे.
ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. शिंदे गटातील फूट आयोगाने ग्राह्य धरू नये, असेही सिब्बल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शिंदे गटाने बाजू मांडताना शिवसेनेची जुनी घटना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे केंद्रित होती. तिच्यामध्ये बदल न करता उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख असे नाव स्वतःसाठी घेतले. परंतु त्यामुळे ते शिवसेनेचे प्रमुख होत नाहीत. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर बेकायदेशीररित्या अध्यक्ष झाल्याचा युक्तीवाद त्यांनी केला होता.
तसेच अँड मनिंदर सिंह यांनी शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद करताना इलेक्शन सिम्बॉल ऑर्डरनुसार पक्ष चिन्ह कुणाचे हे ठरवावे. निवडणूक चिन्ह हे गरीब व अशिक्षित नागरिकांसाठी पक्षाची ओळख असते म्हणून अधिकृत राजकीय पक्षाला अधिकृत चिन्ह मिळते, असे म्हणाले होते. आज त्यावर सिब्बल हे बाजू मांडणार आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.