मुंबई INDIA बैठक तयारी : मुंबई मध्ये होणाऱ्या INDIA च्या तिसऱ्या बैठकीची जोरदार हालचाली

पुणे दिनांक २२ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) बिहार व कर्नाटक नंतर महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी INDIA आघाडीची तिसरी बैठक होणार आहे. सध्या या बैठकीची तयारी जोरात सुरु आहे.त्यानिम्मिता साठी बैठकीचा आढावा घेण्यासाठी उद्या दिनांक २३ऑगस्ट रोजी एक बैठक मुंबईत होणार आहे सदरची बैठक मुंबई मधील हाॅटेल ग्रॅंड हयात येथे दुपारी ४ वाजता होणार असल्याची माहिती सूत्रांनुसार मिळत आहे.
दरम्यान या आढावा बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख प्रमुख उध्दव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जेष्ठ नेते शरद पवार उपस्थित राहणार आहेत.दरम्यान खासदार सुप्रिया सुळे या आज मुंबई पोलीस आयुक्त यांची भेट घेणार आहेत. बैठकीच्या सुरक्षाव्यवस्था दुष्टीने सुळे या भेट घेणार असल्याचे खात्रीलायक रित्या सांगण्यात येत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.