Nashik Graduate Election : नाशिक पदवीधर निवडणूक प्रकरणी काॅग्रेस पक्षाने सुधीर तांबे ना केले निंलबित

नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरुन आता राजकारण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतल्याने काँग्रेस पक्षाने ही कारवाई केली असल्याचं पत्र जारी करण्यात आलं आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबे यांचं पक्षातून निलंबित असणार आहेत.
काँग्रेसचे सुधीर तांबे यांची पक्षातून हक्कालपट्टी करण्यात आली आहे. पुत्र सत्यजित तांबे यांच्यासाठी नाशिक पदवीधर मतदार संघ सोडणे त्यांना महागात पडले आहे. काँग्रेसमधून उमेदवारी अर्ज मिळूनही तांबेंनी तो भरला नाही. म्हणून त्यांच्याविरोधात पक्षविरोधी कारवाई करण्यात आली आहे. कॉग्रेसकडून सुधीर तांबे यांना पदवीधर निवडणूकीत तिकीट देण्यात आलं होते. मात्र पुत्र सत्यजित तांबे यांच्यासाठी सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे नाराज असलेल्या नाना पटोले यांची तक्रार दिल्ली काँग्रेस नेत्याकडे केली होती. त्यावरून शिस्तभंगाची कारवाई सुधीर तांबे यांच्यावर कॉग्रेसकडून करण्यात आली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.