दिल्लीतील अदृश्य हातांकडून माहिती मिळत असावी : प्रफुल्ल पटेल यांच्या होमपिचवर सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या कामाचा 'डेटा'च काढला

पुणे दिनांक २ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) खासदार सुप्रिया सुळे ह्या भंडारा गोंदिया मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी विदर्भाच्या दौऱ्यावर असून त्यांनी यावेळी अजित पवार यांच्या गटात सहभागी झालेल्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या होमपिचवर जाऊन मागील दहा वर्षात पक्ष व संघटनावाढी पटेल यांची कामगिरी समाधानकारक नसल्याच्या दिसून आले आहे.असे म्हणून आगामी काळात येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुका बघता पक्ष संघटनेला बळ देण्यासाठी आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात येतील असे यावेळी स्पष्ट केले आहे.
दरम्यान खासदार सुप्रिया सुळे या भंडारा - गोंदिया मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत त्यांनी रविवारी भंडारा -गोंदिया मतदार संघासह नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे.व नंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया म्हणाले,' भंडारा - गोंदिया मतदार संघात काही वर्षांत पक्षाची कामगिरी समाधानकारक न्व्हती त्यामुळे संघटनेला अधिक बळकट करण्यासाठी या ठिकाणी काही उपाययोजना गरजेच्या आहेत.व त्यादृष्टीने आढावा घेण्यात आला.नेमकी कोणती कामगिरी समाधानकारक नव्हती,असे त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या ' यासंबंधीचा डेटा माझ्याकडे आहे., त्यावरून अभ्यास करून बोलते आहे.' असे सांगून यांवर अधिक भाष्य करण्याचे त्यांनी टाळले.निवडणूक आयोगाच्या सुनावणी बाबत विचारले असता त्या म्हणाल्या ' निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे.त्यामुळे पटेल यांना याची माहिती कुठून मिळते.ही एक कुतुहलाची बाब आहे.दिल्लीत एक अदृश्य हात आहे.त्यांच्या सांगण्यावरून सर्व सूत्रे हलतात कदाचित पटेल यांना त्यांच्या कडून काही माहिती मिळाली असावी.' दरम्यान पक्षचिन्हा बाबत विचारले असता ' राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा आहे . देशातील लहान मुलांना देखील माहित आहे.तसेच वाढनंखा पेक्षा ' महाराष्ट्रात व देशासमोर महागाई व बेरोजगारी मोठी आहे.पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.दुषकाळा कडे लक्ष न देता वाघनखे याला महत्त्व दिले जाते.असे देखील त्या यावेळी म्हणाल्या आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.