Shubhangi Patil : ठाकरे गटाने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दर्शवला

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सध्या अतिशय चर्चेत आहे. कधी सत्यजित तांबे आणि सुधीर तांबे यांनीं उचललेली पावले तर कधी त्यावर काही नेत्यांनी केलेले वक्तव्य !
आता या सगळ्या चर्चेत भर पडलीये धुळ्याच्या 'शुभांगी पाटील' यांची ! नुकतेच त्यांना मातोश्री वर बोलावण्यात आले. मातोश्री वर सध्या सुरु असलेल्या बैठकीत त्या सहभागी झाल्या आहेत. आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) त्यांचा उमेदवार होशीत करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
दरम्यान, उद्धव ठाकरे नाशिकमध्ये भाजपचा डाव त्यांच्यावर उलटवण्याच्या तयारीत आहेत. कारण, काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शुभांगी पाटील यांना शिवसेना आपला पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत होते. सध्या मातोश्रीवर सुरू असलेल्या बैठकीला पाटील यांना पाचारण करण्यात आलेले आहे.
शेवटी ठाकरे गटाने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दर्शवला.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.