आम्हाला आता सरकारच्या शिंदे समितीची गरज नाही.मनोज जरांगे पाटील आक्रमक : मराठा समाजाच्या मुलांबाळावर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी षडयंत्र रचले आहे.मनोज जरांगे पाटील यांचा सनसनाटी आरोप

पुणे दिनांक २७ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाचे नेते व उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज चांगलेच आक्रमक होत एक सनसनाटी आरोप राज्य सरकार वर केला आहे.मराठा समाजातील तरुणांन विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी षडयंत्र रचले आहे.असा आरोप केला आहे.हे नेते दिल्लीला गेले होते.यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत पंतप्रधान यांना काहीच सांगितलं नाही.अशी शंका आहे.व पंतप्रधान जाणूनबुजून आरक्षणावर बोलले नाहीत असं समजायचं का.याची देखील शंका आहे.असं मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले आहेत.
आम्ही राज्य सरकारला तब्बल ४० दिवस त्यांनी मागितले आम्ही ते त्यांना दिले हे सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एकंदरीत टाळाटाळ करत आहेत.एक पुरावा सापडला काय आणि हजारो पुरावे सापडले तरी हे आरक्षण देण्यासाठी अजून दहा वर्षे लावणार आहे का.मराठा समाज हा शेतकरी आहे.म्हणजेच तो कुणबी आहे. हे सिध्द होत आहे.आणी इतर समाजाला आरक्षण देताना त्यांचा कोणता व्यवसायाचा निकष लावला होता.समितीला पुरावे मिळुन देखील तुम्ही मराठा समाजाला आरक्षण का देत नाही याचाच अर्थ तुम्हाला मराठा समाजाचे मुले मोठी झालेली खपत नाही.तुम्ही मराठा समाजाच्या तरुणांवर षडयंत्र रचत आहे.आता आम्हाला शिंदे कमिटी नको आहे.असे जरांगे पाटील म्हणाले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.